Posts

धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं

धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिन्ही सांजची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवा समोर दिवा लावित होती जगासमोर जे चाललं नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं म्हणालं खोटारडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत तू माझ्याशी खोटंच बोललीस आशिर्वाद देताना काय म्हणतेस? की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आई पासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं? तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बरं माझ्या विषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ? बरं वाईट याचं वाटतं कि या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास ...